⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

15 हजारांपेक्षा अधिक वेतनधारकांसाठी येणार नवी पेन्शन योजना !

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२२ । पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना आणण्याचा विचार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ करीत आहे.

वरील वेतन श्रेणीत मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या काही वर्षांपासून नव्या पेन्शन योजनेची मागणी केली जात आहे. जे कर्मचारी पेन्शन योजना 1995 मध्ये कव्हर नाहीत, त्यांच्यासाठी ही योजना राहू शकते. ईपीएफओच्या पुढील 11 आणि 12 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत यासंदर्भातला नवीन पेन्शन योजनेच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

पेन्शनशी संबंधित मुद्द्यावर एका उपसमितीचा अहवाल या बैठकीत सादर केला जाणार आहे. या बैठकीत आर्थिक वर्ष 2021-22 साठीच्या व्याजदरावरही निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याआधीच्या झालेल्या बैठकीत सीबीटी या संस्थेने 2021 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफ ठेवीवर 8.5 टक्के व्याज निश्चित केले होते.

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.