भुसावळ मार्गे नवीन एलटीटी-गोरखपूर विशेष गाडी ; या स्थानकांवर असेल थांबा
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२४ । रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी पाहता प्रशासनाने एलटीटी – गोरखपूर या मार्गावर विशेष गाडीच्या १२ फेऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी भुसावळ विभागातून धावणार असल्याने स्थानिक प्रवाशांची सुद्धा सोय होईल.
०५३२६ एलटीटी – गोरखपूर विशेष गाडी एलटीटी मुंबई येथून बुधवार, शुक्रवार आणि रविवारी १९ ते ३० जून या कालावधीत १०.२५ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजता गोरखपूरला पोहोचेल. या गाडीच्या ६ फेऱ्या होतील. ०५३२५ विशेष गाडी गोरखपूर येथून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार १७ ते
२८ जून या कालावधीत रात्री ९.१५ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी ७.२५ वाजता एलटीटीला पोहोचेल. या गाडीच्या ६ फेऱ्या होणार आहे.
या स्थानकांवर असेल थांबा
ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, बाराबंकी, गोंडा, मनकापूर, बस्ती आणि खलीलाबाद येथे थांबा आहे.