⁠ 
शनिवार, जुलै 20, 2024

धक्कादायक: घर नावावर करण्याच्या वादातून सख्ख्या भावाच्या डोक्यात केला पावडीने वार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| १ ऑगस्ट २०२३। घर नावावर करत नाही म्हणून सख्ख्या भावाने डोक्यात पावडी मारून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (ता. २९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तालुक्यातील म्हसले येथे घडली. सुकलाल चुडामन पाटील हे शनिवारी (ता. २९) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घरी टीव्ही बघत असताना लहान भाऊ जयवंत चुडामन पाटील घरात आला आणि त्याने अचानक कानफटात मारून आईच्या साड्या बाहेर का पडल्या आहेत म्हणत भांडण सुरू केले.

माझे घर नावावर का करत नाही, असे म्हणून शिवीगाळ करू लागला. थोड्यावेळाने भाऊ जयवंत व पुतण्या दोघेही परत घरी आले आणि पुतण्याने मागून पकडून ठेवून भावाने डोक्यावर पावडीने वार केला. त्यामुळे सुकलाल गंभीर जखमी झाला.

उपचारासाठी नर्मदा फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले. संदेश पाटील व सुनील जाधव या पोलिसांनी दवाखान्यात येऊन जबाब घेतल्यावर अमळनेर पोलिस ठाण्यात जयवंत पाटील व अजय पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील जाधव तपास करीत आहेत.