विरावली येथील विकास सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील विरावली येथे विविध कार्यकारी सोसायटी मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनलला 12 पैकी 10 जागांवर जिंकून घवघवीत यश मिळाले. तर शिवसेना पुरस्कृत शेतकरी एकता पॅनलला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले.
दि.3 एप्रिल रोजी विरावली येथे झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनलचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष ॲड.देवकांत पाटील, नावरे गावचे माजी सरपंच समाधान पाटील, रमेश शामराव पाटील, माजी चेरमन संजय पाटील, राष्ट्रवादी उपाध्यक्ष पवन धीरज, महाजन पाटील , शरद राजपूत , यशवंतराव पाटील, गोरख पाटील गणेश पाटील यांनी केले. यात एकूण 496 पैकी 390 मतदान झाले. विजयी झालेल्या उमेदवामध्ये बाजीराव माणिक पाटील यांना सर्वाधिक 200 प्रल्हाद पाटील, 198 कोकिळा पाटील 192 अर्जुन पाटील 190, प्रमिला पाटील 183 उषा महाजन 175 युवराज पाटील 173 , गुलाब पाटील 169 रमेश पाटील 169 मते यश मिळवले.
काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ता तथा माजी नगराध्यक्षा अतुल पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुकेश येवले, विधानसभेचे क्षेत्र प्रमुख अनिल साठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा गावातील विकास सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन नितीन चौधरी, साखळी पीक संरक्षणचे चेअरमन दीपक पाटील, वाढोदा गावचे सरपंच संदीप सोनवणे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, उंटावदचे विकाचे चेअरमन शशिकांत पाटील तसेच विरावली, यावल, वाढोदा, नावरे, माहेलखेडी, मोहराळा गावातील शेतकरी आदींनी नवनिर्वाचीत संचालक व पॅनल चे नेतृत्व करणारे सर्वाचे अभिनंदन करण्यात आले.