⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | महाराष्ट्र | आमच्यावर हल्ला करा, गोळ्या मारा, तुरुंगात टाका, तरी आम्ही शिवसेनेतच राहू – संजय राऊत

आमच्यावर हल्ला करा, गोळ्या मारा, तुरुंगात टाका, तरी आम्ही शिवसेनेतच राहू – संजय राऊत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२३ । आमच्यावर हल्ला करा, गोळ्या मारा, तुरुंगात टाका, तरी आम्ही शिवसेनेतच राहू. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे प्रेरणास्थान आहे, तर उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत आणि सदैव राहतील, बाकी सर्व हा औटघटकेचा खेळ असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंडाला आपल्या नावाची सुपारी दिल्याचा आरोप खासदार राऊत यांनी मुंबईत केला होता. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंबई पोलिस आयुक्तांना त्यांनी पत्र दिले. त्या पार्श्वभूमीवर ठाणे येथील पोलिस पथकाने नाशिकमध्ये खासदार राऊत यांची भेट घेऊन जबाब नोंदविला.

काही माहिती व घटना माझ्या कानावर आली. ती संबंधित यंत्रणेला कळविली आहे. आता त्यांचे काम ते करतील, माझ्या बाजूने विषय संपला आहे. गुंडांवर मी बोलत नाही. आता पोलिस त्यांचे काम करतील. जन्मठेप व खंडणीचे आरोप असलेल्या गुंडांचे संबंध मुख्यमंत्र्यांबरोबर आणि त्यांच्या पुत्रांबरोबर असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह