जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । राज्यभरात विधानपरिषद निवडणुकीची चाहूल लागली असून २० जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी सर्व पक्षाकडून चाचपणी सुरु आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून काही नावे निश्चित झाली असून माजी मंत्री एकनाथराव खडसेंना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. नाथाभाऊंच्या पक्ष प्रवेशावेळी त्यांना राष्ट्रवादी पक्षाने तुम्हाला आम्ही विधान परिषदेत नेऊ असे वचन दिले होते. राष्ट्रवादीने आपला शब्द पाळला देखील आणि राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादी खडसेंचे नाव देखील पाठविले परंतु गेल्या दीड वर्षापासून ती यादी प्रलंबित आहे. त्यामुळे आता चालून आलेल्या संधीत राष्ट्रवादी काँग्रेस दिलेला शब्द पळणार कि भाजपा सारखा नाथाभाऊंना डच्चू देणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे,

२०१४ साली भारतीय जनता पक्षाची सत्ता संपूर्ण महाराष्ट्रात आली तेव्हा नाथाभाऊंचा त्यात मोठा वाटा होता. एकनाथराव खडसे हे तेव्हा तब्बल १२ खात्याचे मंत्री होते. मात्र दिवस बदलले आणि खडसे भाजपमध्ये एकाकी पडले. खडसेंना पदाचा राजीनामा द्यावा लागला. २०१९ च्या निवडणुकीत खडसेंचे तिकीट कापण्यात आले. त्यानंतर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत खडसेंऐवजी गोपीचंद पाडळकर यांना संधी भाजपने खडसेंना डच्चू दिला. आपले कुठे पुनर्वसन होईल, भोसरीचा अहवाल जाहीर होईल आणि आपण निर्दोष असल्याचे जगासमोर येईल असे खडसेंना वारंवार वाटत होते मात्र मनाप्रमाणे काही घडलेच नाही. उलटपक्षी खडसेंनाच भाजपात त्रास होऊ लागला. अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला,

एकनाथराव खडसेंप्रमाणे मोठा नेता आपल्याकडे येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे वेलकम केले. खडसेंना मंत्रीमंडळात पाठविण्यासाठी त्यांनी विधानसभा किंवा विधान परिषद सदस्य असणे आवश्यक होते. खडसेंना राष्ट्रवादीने दिलेल्या शब्दासाठी विधान परिषदेच्या निमित्ताने त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जाणार आहे. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीत त्यांच्या नावाचा प्रस्तावही होता. मात्र ही यादीच दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. काल रात्री झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांनी एकनाथराव खडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. यामुळे नाथाभाऊंना दिलेला शब्द राष्ट्रवादी पाळणार अस म्हंटल जात आहे.
महाराष्ट्रात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आणि राजकीय उलथापालथ जोरात सुरु आहे. राज्यसभेच्या रणधुमाळीतच विधान परिषद निवडणूक देखील येऊन ठेपली आहे. राज्यसभा निवडणूक १० जून रोजी पार पडल्यानंतर २० जून रोजी विधानसभा निवडणूक देखील पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या उमेदवारीचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत ९ जून आहे. त्यामुळे अर्ज भरायला आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी २७ मतांची आवश्यकता आवश्यकता आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सोमवारी बैठक झाली असून एकनाथराव खडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.मात्र राजकारणात काहीही होऊ शकत हा इतिहास आहे. यामुळे आता नाथाभाऊ आमदार होणार कि राष्ट्रवादी काँग्रेस आपला शब्द नाही पाळणार ? हे पहाणें उत्सूकतेचे ठरणार आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना माहिती दिली कि, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना नाथाभाऊंना किंबहुना एकनाथराव खडसे यांना विधान परिषदेत जाणण्याचा शब्द देण्यात आला होता. आता पुढे काय होते हे पक्षच ठरवेल मात्र आता तरी त्यांचे नाव आघाडीवर आहे.







