जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२३ । जळगाव जिल्ह्याचे आणि राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांच्यावर राष्ट्रवादी मोठी जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. यावेळी एकनाथराव खडसे यांची राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या गटनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक माहिती अशी कि, राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना याबाबतचे पत्रही देण्यात आले आहे असल्याच्या चर्चा आहेत. विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रतोद म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर दुरीकडे, एकनाथ खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव असल्याने त्यांना गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस या खेळमध्ये राजकारणही खेळू पाहत आहे. कारण खडसेंच्या माध्यमातून जळगावमध्ये राष्ट्रवादीला अधिक बळ मिळेल आणि आगामी निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल असे पक्षाचे राजकीय गणित आहे. यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेता खडसेंवर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय संघर्ष अनेकवेळा जळगावमध्ये पाहायला मिळतो. खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते विधानपरिषदेवर आमदार झाले. त्यानंतर आता त्यांच्यावर राष्ट्रवादी मोठी जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत आहे.