⁠ 
सोमवार, जून 17, 2024

विविध समस्यांच्या निवारणासाठी राष्ट्रवादीतर्फे जनता दरबार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येत्या सोमवार दि. १७ जानेवारीपासून दररोज जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात जळगाव शहरातील रहिवाशी व नागरिकांच्या विविध समस्यांचे निवारण करण्यात येईल. तरी नागरिकांनी आपल्या समस्या निवारणा कामी वरील वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगरच्या वतीने नागरिकांच्या विविध समस्यांचे जसे की वैद्यकीय सेवेबाबत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तहसिलदार कार्यालय,संजय गांधी निराधार योजना,स्वस्त धान्य दुकानामार्फत मिळणारे धान्य वाटप, विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक बाबतीत निवारण करण्यासाठी सोमवार दि. १७ जानेवारीपासून दररोज सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळात जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे.

यांच्याशी साधावा संपर्क
समस्या निवारण करण्याकामी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,महानगर (जिल्हा) अध्यक्ष अशोक लाडवंजारी, (मो. ९८६००२९१९१), उपाध्यक्ष अमोल कोल्हे (मो.९०२१८३९२६५), उपाध्यक्ष भगवान सोनवणे (मो.९८६०२०१३९९),सरचिटणीस सुनिल माळी (मो.नं.९८६००२८०८०), विशाल देशमुख (मो.८८३०३७७४२४) ,सुशिल शिंदे (मो.९४०४०४७४२४), अकिल पटेल (मो.९७३००७२५५५),राजु मोरे( मो.९८९०८७७५११), किरण राजपूत (मो.९८९०४५६४१७) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा :