महाराष्ट्रराजकारण

निंभोरा स्टेट बँकेसमोर राष्ट्रवादी ओबीसी सेलचे ठिय्या आंदोलन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । निंभोर्‍यातील स्टेट बँकेन गतवर्षी केळी पीक विम्याची रक्कम कापल्यानंतरही 50 दिवस उलटून विमा मंजूर झाल्यानंतरही ही रक्कम खात्यात न आलेल्या 16 शेतकर्‍यांची रक्कम त्यांना मिळावी अन्यथा यासाठी सोमवारी आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी स्टेट बँक व्यवस्थापक राधेश्याम मुंगमुळे यांना दिला होता. मागणीची दखल न घेतल्याने सोमवारी सकाळी निंभोर्‍यातील स्टेट बँकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

बँक व्यवस्थापक यांनी एक पत्र देत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले मात्र त्यावर सुनील कोंडे यांनी आक्षेप घेत बँकेची हमी मिळावी, अशी मागणी केली व घोषणाबाजी कराीत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले. यानंतर बँक व्यवस्थापक राधेश्याम मुंगमुळे यांनी बँकेच्या वरीरष्ठ अधिकारी, कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांच्याशी संपर्क साधत चर्चा केली तर विमा कंपनी व बँकेच्या वरीष्ठांना मेल करीत आम्हाला काही दिवसांचा अवधी द्यावा, अशी शेतकर्‍यांना लेखी विनंती केली व या संबंधी कृषी विभागामार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे ही समस्या मांडण्यात येईल यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात यावर पुढील भूमिका ठरेल, अशी माहिती व्यवस्थापक मुंगमुळे यांनी देत तसे लेखी पत्र दिल्यावर शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त करीत ठिय्या आंदोलन मागे घेतले.

यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांच्यासोबत राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे, डॉ.एस.डी.चौधरी, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रमोद कोंडे, ऐनपूरचे ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील, ऐनपूरचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष मोहन कचरे, माजी सरपंच डिगंबर चौधरी, प्रा.दिलीप सोनवणे, शेतकरी गोपाळ भिरुड, धीरज भंगाळे, रामभाऊ सोनवणे, गोपाळ बर्‍हाटे, राकेश बर्‍हाटे, जगदीश बढे, अक्षय सरोदे, विपीन झांबरे, डॉ.श्रीराम पाटील, जयंत भंगाळे, रोशन खाचणे, ललिता जावळे, हेमंत जावळे, अनिता बढे, आशा लढे व शेतकरी बांधव उपस्थित होते. सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, एएसआय राका पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Related Articles

Back to top button