रविवार, डिसेंबर 10, 2023

कर्तृत्ववान माणसांना दुय्यम स्थान दिलं की अशा घटना घडतात ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । कर्तृत्ववान माणसांना दुय्यम स्थान मिळालं की अशा घटना घडतात हे आपण याआधी बघितलं आणि आपण आजही बघत आहात अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आमचं डबल इंजिनच्या सरकार आता ट्रिपल इंजिन झाला आहे. आम्हाला एका नव्या इंजिनची जोड मिळाली आहे. आता महाराष्ट्राचा विकास ट्रिपल इंजिनच्या वेगाने होणार आहे. असे एकनाथ शिंदे म्हणाले

गेल्या कित्येक दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याचे चर्चा होत्या त्यातच त्यांनी आज उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं असल्यामुळे त्यांच्या त्या नाराजीवर शिक्कामोर्तब झाला आहे. याचबरोबर अजित पवार यांनी सरकारला पाठिंबा दिल्याने त्यावर शिक्का मोडतात झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांच्या स्वागत केलं असून लवकरच महाराष्ट्राचा विकास अजून वेगाने होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.