मंत्रालयातील ‘शापित’ कॅबीन बाबत नाथाभाऊ म्हणाले…!
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२२ । मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर कॅबीन 602 कुणीही मंत्री घेत नाहीये.यामुळे राज्यातील राजकाणामध्ये हा विषय चर्चचा झाला आहे.यावर खडसे यांनी आपली प्रतीक्रीया दीली आहे. पत्रकार परीषदेत माजी मंत्री एकनाथराव खडसेंना म्हणाले की, मला ती कॅबीन मिळाली होती मात्र त्यानंतर आपल्यावरही अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याची स्पष्टपणे कबुली येथे दिली.
खडसे म्हणाले की, 2014 आधी 602 नंबरच्या कॅबीनमध्ये अजित पवार बसले होते. त्यानंतर त्यांच्यावरही आरोप झाले तर नारायण राणेंना आरोपानंतर राजीनामा द्यावा लागला तर विजयकुमार गावीत असो की मी माझ्यावर आरोप झाले त्यामुळे कदाचित अनेक जण पायउतार झाल्यानेच 602 क्रमांकाची कॅबीन घेण्यास कुणीही तयार नसावे,
अजित पवारांना 2014 मध्ये ही कॅबीन मिळताच सिंचनसह शिखर बँकेवरुन घोटाळ्याचे आरोप झाले. एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजप नेते पांडुरंग फुंडकर 602 केबिनमध्ये आले. खडसेंच्या कृषीखात्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली. मात्र त्यांचं अकाली निधन झालं. भाजपचे अनिल बोंडे 602 कॅबीनमध्ये आले व कृषीखात्याची जबाबदारी बोंडेकडे आली मात्र मंत्री असूनही 2019 च्या निवडणुकीत बोंडेंचा पराभव झाला.