मोठी बातमी ! नाशिक पोलिसांची जळगाव जिल्ह्यातील जुगाराच्या अड्ड्यावर धाड

सप्टेंबर 13, 2024 10:28 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात एकीकडे गुन्हेगारी वाढताना दिसत असून यातच अवैध धंदेही मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी नियुक्त केलेल्या टीमने जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात घुसून जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई केली असून त्यामुळे जुगार चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

erandol jugar

या कारवाईत 1 लाख 31 हजार 140 रुपये रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोल येथील हॉटेल मयुरी गार्डन येथे पत्त्यांचा क्लब सुरु असल्याची गुप्त माहिती नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयास प्राप्त झाली होती.पत्त्यांच्या क्लबबाबत माहिती मिळाल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने क्लबवर छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले.

पोलीस पथकाने टाकलेल्या धाडीत 1 लाख 31 हजार 140 रुपये रोख रकमेसह मोबाईल आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. पोलीस पथकाने धाड टाकताच अन्य काही जण भिंतीवरून उड्या मारून फरार झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now