⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | या जिल्ह्यात ‘मविआ’त फूट पडणार? एकनाथ खडसेंचे निकटवर्तीय जाणार भाजपात?

या जिल्ह्यात ‘मविआ’त फूट पडणार? एकनाथ खडसेंचे निकटवर्तीय जाणार भाजपात?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२४ । ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे भाजपात घरवापसी करणार आहे. खडसेंचा भाजप प्रवेशामुळे मात्र महाविकास आघाडीवर परिणाम होणार आहे. नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे. कारण नंदुरबार जिल्हात एकनाथ खडसे यांना मानणारा मोठा गट असून ते देखील भाजपात घरवापसी करणार; अशी शक्यता आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार उदेसिंग पाडवी हे आज महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असताना त्यांनी तसे सूचक विधान केले आहे. एकनाथ खडसे हे भाजपात जाणार असल्याने उदेसिंग पाडवी देखील भाजपा जातील का? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे भाजपात जात असल्याने याच्या परिणाम महाविकास आघाडीवर होणार असून, नंदुरबार जिल्हा देखील खडसे यांना मानणारा मोठा गट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांना मानणारा वर्ग देखील भाजपात घरवापसी करणार; अशी शक्यता आहे.

एकनाथ खडसे काही दिवसानंतर भाजपात जातील. परंतु त्याआधी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. एकनाथ खडसे आम्हाला ज्यावेळेस बोलतील आणि आमच्या समोर त्यांची भूमिका मांडतील. त्यावेळेस आम्ही विचार करू, असं विधान माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केले आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीत पुन्हा फूट पडणार का अशी देखील चर्चा रंगली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.