जळगावकरांनो.. तुमच्या वार्डात निवडून आलेल्या नगरसेवकांचे नाव काय? वाचा

जानेवारी 17, 2026 11:21 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहर महानगर पालिकेच्या ७५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीला तब्बल ६९ जागांवर अभूतपूर्व यश मिळाले आहे. यामुळे जळगाव पालिकेवर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

jalgaon manapa

विशेष या निवडणुकीत भाजपच्या ४६ पैकी ४६ जागा जिंकून आल्या आहेत. यामुळे जळगाव पालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने देखील २२ जागांवर विजय मिळवत दुसरा मोठा पक्ष ठरला. यापाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गट-०१, शिवसेना ठाकरे गट- ०५ आणि अपक्ष-०१, अशी विजयी उमेदवारांची संख्या आहे. दरम्यान जळगावात कोणत्या पक्षाचे उमेदवार कोणत्या प्रभागातून निवडून आले. आपण विजयी उमेदवारांची नावे जाणून घेणार आहोत.

प्रभाग क्रमांक १
अ- रिता सपकाळे (भाजप), ब- दिलीप पोकळे (शिंदे गट), क- संगीता दांडेकर (शिंदे गट), ड-भारती सोनवणे (अपक्ष)

प्रभाग क्रमांक २
अ- सागर सोनवणे (शिंदे गट), ब- उज्ज्वला बाविस्कर (शिंदे गट), क- पूजा जगताप (भाजप), ड- विजय बांदल (भाजप)

प्रभाग क्रमांक ३
अ- अर्चना (भाजप), ब- प्रतीक्षा सोनवणे (भाजप), क- प्रवीण कोल्हे (शिवसेना), ड- निलेश तायडे (भाजप)

प्रभाग क्रमांक ४
अ- शशीबाई ढंढोरे (भाजप), ब- विद्या सोनावणे (भाजप), क- कल्पेश सोनवणे (भाजप), ड- पीयूष कोल्हे (शिंदे गट)

प्रभाग क्रमांक ५
अ- विष्णू भंगाळे (शिवसेना), ब- मंगला चौधरी (शिवसेना), क- आशा पाटील (भाजप), ड- नितीन लड्ढा (भाजप)

प्रभाग क्रमांक ६
अ-अर्शिन बानो खाटीक (ठाकरे गट), ब- शुचिता हाडा (भाजप), क- अमित काळे (भाजप), ड- दीपक सूर्यवंशी (भाजप)

प्रभाग क्रमांक ७
अ- दीपमाला काळे (भाजप), ब- अंकिता पाटील (भाजप), क- विशाल भोळे (भाजप), ड- चंद्रशेखर अत्तरदे (भाजप)

प्रभाग क्रमांक ८
अ- कविता पाटील (भाजप), ब- मानसी भोईटे (भाजप), क- अमर जैन (भाजप), ड- नरेंद्र पाटील (शिवसेना)

प्रभाग क्रमांक ९
अ- मनोज चौधरी (शिंदे गट), ब- प्रतिभा देशमुख (शिवसेना), क- जयश्री पाटील (भाजप), ड- चंद्रशेखर पाटील (भाजप)

प्रभाग क्रमांक १०
अ- सुरेश सोनवणे (भाजप), ब- माधुरी बारी (भाजप), क- कविता भोई (भाजप), ड- जाकीर खान रसूल खान (भाजप)

प्रभाग क्रमांक ११
अ- डॉ. अमृता सोनवणे (शिंदे गट), ब- संतोष पाटील (शिंदे गट), क- सिंधु कोल्हे (शिंदे गट), ड- ललित कोल्हे (शिंदे गट)

प्रभाग क्रमांक १२
अ-अनिल अडकमोल (भाजप), ब- उज्ज्वला बेंडाळे (भाजप), क- गायत्री राणे (भाजप), ड- नितीन बरडे (भाजप)

प्रभाग क्रमांक १३
अ- नितीन सपके (भाजप), ब- सुरेखा तायडे (भाजप), क- वैशाली पाटील (भाजप), ड- प्रफुल्ल देवकर (राष्ट्रवादी अजित पवार गट),

प्रभाग क्रमांक १४
अ- सुनील महाजन (भाजप), ब- जयश्री महाजन (भाजप), क- राबियाबी अमजद खान (भाजप), ड- रितिका ढेकळे (भाजप)

प्रभाग क्रमांक १५
अ- अरविंद देशमुख (भाजप), ब- कलाबाई शिरसाळे (भाजप), क- रेश्मा काळे (शिंदे गट), ड- प्रकाश बालाणी (भाजप)

प्रभाग क्रमांक १६
अ- डॉ. वीरेन खडके (भाजप), ब- वंदना इंगळे (भाजप), क- रंजना वानखेडे (भाजप), ड- सुनील खडके (भाजप)

प्रभाग क्रमांक १७
अ- जरीनाबी शब्बीर शहा (ठाकरे गट), ब- हीनाबी शाकीर खान (ठाकरे गट), क- इब्राहिम पटेल (ठाकरे गट), ड- अक्षय वंजारी (ठाकरे गट)

प्रभाग क्रमांक १८
अ- डॉ. गौरव सोनवणे (शिंदे गट), ब- नलूबाई सोनवणे (शिंदे गट), क-अनिता भापसे (शिंदे गट)

प्रभाग क्रमांक १९
अ- रेखा चुडामण पाटील (शिंदे गट) ब- गणेश सोनवणे (शिंदे गट ), क- निकिता वंजारी (शिंदे गट), ड- राजेंद्र घुगे (भाजप)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now