जिल्हा युवा पुरस्कार लवकरात लवकर प्रदान करण्यात यावे

जुलै 26, 2021 9:30 PM

जळगाव लाईव्ह न्युज| २६ जुलै २०२१| जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हे पुरस्कार प्रलंबित आहेत.यामुळे तीन वर्षांचे एकूण नऊ पुरस्कार प्रलंबित आहेत. हे पुरस्कार लवकरात लवकर देण्यात यावे या संदर्भात जिंदगी फाउंडेशन या सामाजिक संस्थेने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले.
गेल्या तीन वर्षांच्या पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया लवकर घेवून हे पुरस्कार जाहीर करण्यात यावे अशी मागणी जिंदगी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुश्मिता भालेराव यांनी केली आहे.

IMG 20210726 WA0019 jpg webp

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now