जळगाव पुन्हा हादरले : चारीत्र्याच्या संशयातून पत्नीनेच संपविले पतीला..

डिसेंबर 13, 2022 5:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येतेय. अशातच एक घटना धक्कादायक घटना समोर आलीय. पत्नीच्या चारीत्र्यावर वारंवार संशय घेणार्‍या पतीचा पत्नीनेच विळ्याचे डोक्यावर सपासप वार करीत खून केल्याची धक्कादायक घटना बोदवड तालुक्यातील पाचदेवळी गावात रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दगडू पुंडलिक सुरवाडे (पाचदेवडी, ता.बोदवड) असे खून झालेल्या पतीचे तर आशा दगडू सुरवाडे असे अटकेतील आरोपी पत्नीचे नाव असून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी मयताच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार वरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

jalgaon crime 1 3 jpg webp

दगडू सुरवाडे हे शेतकरी पत्नी आशा, मुलगी रोशनी (17) सह पाचदेवडी, ता.बोदवड गावात वास्तव्याला होते मात्र सुरवाडे यांना दारूचे व्यसन असल्याने ते पत्नी आशा यांच्या चारीत्र्यावर संशय घेत नेहमीच वाद करीत असल्याने त्यास कुटुंब वैतागले होते. रविवारी सायंकाळीदेखील दगडू सुरवाडे हे शेतातून आल्यानंतर गावात गेले व मद्यप्राशन करून घरी परतले मात्र पुन्हा त्यांनी पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत वाद उकरून काढला. त्यानंतर आशा सुरवाडे यांनी घरातील धारदार विळा काढून दगडू सुरवाडे यांच्या डोक्यावर सपासप वार करण्यास सुरूवात केली. घरातील आरडा-ओरड होत असल्याचे पाहून गल्लीतील नागरीक जमा झाले तसेच मुलगी रोशनीदेखील पोहोचली.

आरोपी पत्नीला पोलिसांकडून अटक
मुलगी रोशनी हिने आई आशाबाई यांना किचनमध्ये नेत बसवून ठेवले व वरणगाव पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलिसांनी धाव घेत आशाबाई सुरवाडे यांना अटक केली. रोशनी यांच्या तक्रारीवरून वडिलांच्या खून केल्याप्रकरणी आई आशाबाई सुरवाडे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. तपास सहा.निरीक्षक आशिषकुमार अडसुळ व सहकारी करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now