जळगाव शहरगुन्हे

जळगाव शहर पुन्हा हादरले; डोक्यात धारधार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून !

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहर खुनाच्या घटनेने पुन्हा एकदा हादरले आहे. शहरालगत असलेल्या निमखेडी शिवारात तरुणाचा धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. सागर साहेबराव सोनवणे असं खून झालेल्या तरुणाचे नाव असून मारेकऱ्यांनी सागरच्या डोक्यात वार करून त्याला जखमी अवस्थेत फेकून दिले होते.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी सागरला तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

या खून प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात काळीज चिरणारा आक्रोश केला होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button