Murder : गुप्तांगावर वार करीत जळगावच्या तरुणाचा नेपानगरात खून

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । गेल्या दिड महिन्यापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा गुप्तांगावर वार करीत खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील दोघांना ११ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. भिकन शामसिंग परदेशी आणि विठ्ठल प्रेमसिंग परदेशी दोन्ही (रा. रायपुर, ता जि जळगाव) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.

crime 2022 06 09T184834.333

रायपूर येथील आशा भुषण तळेले या महिलेचा पती भुषण तळेले हा १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुचाकीने भुसावळ येथे मोटार सायकलवर गेला होता. जाताना त्याने मोबाईल सोबत नेला होता. त्यानंतर भुषण तळेले हा तरुण घरी परत न आल्याने नातेवाईकानी सर्वत्र शोध घेऊन देखील तपास लागला नाही. त्यानंतर त्याची मोटार सायकल रायपूर कुसुंबा परिसरात पडलेली आढळून आली. जवळच गाडीची चावी देखील पडलेली होती. त्या चावीने डिक्की उघडून पाहिली असता त्यात मोबाईल आढळून आला.

बेपत्ता भुषण तळेले हा भिकन परदेशी या ठेकेदारकडे कामाला जात होता. ठेकेदार भिकन परदेशी हा वेळोवेळी बेपत्ता भुषण तळेले याच्या पत्नीकडे येऊन सांगत होता की मी तुझ्या पतीला शोधून आणतो. तु घर सोडून कुठेही जाऊ नको. तुझा पती परत आणून देण्याची जबाबदारी माझी आहे. तु जर माझे ऐकले नाही तर मी गळफास घेऊन आत्महत्या करुन घेईन. भिकन परदेशी प्रमाणेच विठ्ठल परदेशी हा देखील महिलेला तिच्या बेपत्ता पतीबद्दल विविध प्रकारची माहिती देत असल्याने महिला गोंधळून गेली आहे. या दोघांना बेपत्ता पतीची माहिती असून ते दिशाभुल करत असल्याचा दाट संशय व्यक्त केला होता.

सदर आरोपी यांना लागलीच पोलीस हेडकॉन्स्टेबल गफुर तडवी व सिद्धेश्वर यांनी कुसुंबा येथून ताब्यात घेतले होते. या दरम्यान त्यांची चौकशी पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी केल्यावर त्यांना पोलीस खाक्या दाखवतात त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली होती. त्याप्रमाणे त्यांना अटक करण्यात येऊन त्यांची पोलिस कस्टडी रिमांड ही पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख यांनी घेतली होती व आरोपींना आज एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पथक पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख गफुर तडवी सुधीर साळवे सिद्धेश्वर दापकर व आरोपी असे मध्य प्रदेशात रवाना झाले होते त्याप्रमाणे आरोपी यांनी खून केल्याचे ठिकाण दाखवले होते ते ठिकाण नेपानगर तालुक्यातील झांजर गावाच्या पुढे बराणपुर खंडवा रोडवर तलावाजवळ होते याच ठिकाणी आरोपी यांनी मयत यास गुप्तांगावर तसेच गळा दाबून खून केल्याचे कबूल केले होते स्थानिक पोलिस यांच्या मदतीने त्याचे प्रेत बाहेर काढण्यात आले होते त्यावेळी त्याचे नातेवाईक देखील उपस्थित होते मयताचे मुळगाव ये भातखेडा येथील असून घटनास्थळापासून ते बारा किलोमीटर आहे तसेच सासर हे चांदणी गावातून घटनास्थळापासून आठ किलोमीटर लांब आहे पुढील तपास सुरू आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now