गुन्हेजळगाव शहर

Murder in Jalgaon : शिवाजीनगर हुडकोत पुन्हा खून, धारदार शस्त्राने केले वार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । शहरात खुनाची मालिका सुरूच असून सोमवारी पुन्हा शिवाजीनगर हुडकोजवळ खून झाला आहे. मोहम्मद मुसेफ शेख इसाक वय-४० रा.हुडको असे मयताचे नाव असून खुनाचे कारण आणि मारेकरी अज्ञात आहे.

जळगाव शहरात गेल्याच आठवड्यात एकाच ७.३० दोन खून झाले होते. पोलिसांनी काही तासात खुनाचा छडा लावला होता. सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बर्फ फॅक्टरी गवळीवाडाजवळ मोहम्मद मुसेफ शेख इसाफ या तरुणाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. मुसेफ हा हुडको परिसरात राहून हमाली काम करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होता. गेल्या वर्षभरापासून तो रिकामाच असल्याने परिसरात फिरत असे.

सोमवारी मुसेफचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. नमाजसाठी नागरिक जात असताना घटना त्यांच्या लक्षात आली. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पथक पोहचले आहे. मयताजवळ चॉपरचे कव्हर, एका शस्त्राची मूठ, रुमाल असे साहित्य पडले आहे.

व्हिडीओ :

https://fb.watch/caPXE02tl9/

Related Articles

Back to top button