⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

‘सुंदर जळगाव’ करण्यासाठी लागणारी सौंदर्यदृष्टीच मनपाकडे नाही

जळगाव लाईव्ह न्यूज। चिन्मय जगताप । जळगाव शहर महानगरपालिकेचे घोषवाक्य काय? तर ते म्हणजे ‘स्वच्छ शहर सुंदर शहर’. हेच स्वप्न सत्यात उतरवायचं असेल तर त्यासाठी लागेते ती म्हणजे सौंदर्यदृष्टी. मात्र हीच सौंदर्यदृष्टी जळगाव शहर महानगरपालिकेकडे पाहायला मिळत नाही.(NO aesthetic vision FOR JALGAON CITY)

एखाद शहर कितीही गजबजलेलं असू द्या. त्या शहरात कितीही गर्दी असू द्या. मात्र शहर चालवणाऱ्या प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधीकडे समजा सौंदर्यदृष्टी असेल तर काही ना काही चांगले उपक्रम शहरांमध्ये राबवता येतात. विविध ठिकाणी छोट्या जागेचं नियोजन करता येतं. असंच नियोजन राज्यातल्या मोठ्या शहरांमध्ये विविध ठिकाणी युवकांसाठी, नागरिकांसाठी केले जातं. जिथे येऊन नागरिक आपला वेळ घालवू शकतील किंवा इतर शहरातून येणाऱ्या नागरिकांना तिथे घेऊन जाणं शक्य असेल.(PLACE TO VISITE IN JALGAON)

मात्र जळगाव शहराच्या कारभार ज्या महानगरपालिकेकडे आहे. त्या महानगरपालिका प्रशासनाकडे आणि निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडे जळगाव शहर सुंदर कसे होईल? यासाठी लागणारी सौंदर्यदृष्टीच नाहीये. यामुळे आधीच बकाल असलेल जळगाव शहर अजून बकाल होत चाललंय.()

सौंदर्यवृष्टी म्हणजे काय? तर जर आपलं शहर हे सुंदर दिसलं पाहिजे तर त्या शहरांमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असणे अतिशय गरजेच्या आहेत. शहरात एखादी भिंत उभारणे. शहरात छोटे-मोठे ठिकाण तयार करणे. जिथे नागरिक येऊ शकतात. मात्र जळगावचा विचार केला तर अख्या शहरात केवळ दोन ते तीनच असे ठिकाण आहेत. मात्र तिथे जाण्यासाठीही जळगावकरांकडे चांगले रस्ते नाहीत. अशावेळी जळगाव शहरात विविध ठिकाणी चांगले स्पॉट बांधणे अतिशय गरजेचे आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नगरसेवक नितीन लढा हे महापौर असताना त्यांच्या काळात ‘भाऊंचे उद्यान’ हे जळगावत बांधण्यात आले. मात्र त्यानंतर असा कोणताही प्रयत्न आलेल्या एकाही महापौराने केलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. (NITIN LADDHA JALGAON)

जळगावकडे इतका मोठा मेहरून तलाव आहे. मात्र त्यात तलावाचं काहीतरी करावं असं कोणालाच वाटत नाही. महापौर जयश्री महाजन गेल्या काही दिवसांपासून त्याचा पाठपुरावा करत आहेत. मात्र त्यांच्याही हाती यश मिळताना दिसत नाहीये. (MEHERUN TALAV JALGAON)

जळगाव शहराची ओळख असणाऱ्या जुन्या जळगाव मध्ये असलेल्या गल्ल्यांमध्ये सौंदर्यदृष्टीने विचार केल्यास खूप चांगलं पर्यटन स्थळ उभं राहू शकतं. मात्र ते करण्याची कोणाचीच इच्छा नाही हेच दिसून येत आहे. (OLD JALGAON)

एकीकडे संपूर्ण फुले मार्केट बकाल होतं आहे. रोज अतिक्रमणामुळे होणारा नागरिकांना त्रास आपण पाहतोय. मात्र याच हॉकर्सला घेऊन सुंदर होकर झोन तयार करता येऊ शकतो. हे अजूनही जळगावच्या कोणत्याच नेत्याला किंबहुना जळगाव शहर महानगरपालिकेला समजलेलं नाही.(HOWKERS IN JALGAON)

बालगंधर्व नाट्यगृहा सारखे अति उच्च दर्जाचे नाट्यगृह आहे. त्याची तऱ्हा न सांगितलेली बरी. गेल्या वर्षभरापासून त्याचं कामच सुरू आहे. याचा मागचं कारण काय? कोणालाच माहित नाही.

या सगळ्यात सर्वात वाईट बाब म्हणजे सौंदर्यदृष्टी असणारा साधा आराखडा ही महानगरपालिकेकडे नाही. आपण ज्या नागरिकांवर ज्या शहरावर शासन करत आहोत ज्याचे आपण प्रशासक आहोत ते शहर सुंदर कसं होईल? यासाठी कोणी विचारच केलेला नाही.


याबाबत मनपा प्रशासनाचे चर्चा केली असता प्रशासनातर्फे सांगण्यात आले की, सध्या जळगाव शहराची गरज रस्ते आहेत. यामुळे आमचा कल हा रस्ता बांधणीकडे जास्त आहे. रस्त्यांची काम पूर्ण होताच इतर गोष्टींकडे पाहता येईल. मात्र आता या क्षणाला जळगाव शहरात रस्त्याची गरज जास्त आहे. त्यासाठी अधिकचा निधी कसा आणता येईल? याकडे आमचा कौल जास्त आहे.