जळगाव जिल्ह्यात चार तासात 16.60 टक्के मतदान; वाचा नगरनिहाय मतदानाचा टक्का

डिसेंबर 2, 2025 1:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आज २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळच्या ११.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात १६.६० टक्के मतदान झाले आहे. सुरुवातीच्या मंद प्रतिसादानंतर पुढील तासांत मतदारांनी चांगला उत्साह दाखवत मतदानाचा टक्का वाढताना दिसला.

loksabha election jpg webp

जिल्ह्यातील १८ नगरपरिषदांमध्ये एकूण 8 लाख 89 हजार 914 इतके मतदार मतदानाचा हक्क् बजावणार आहे. त्यापैकी १,४६,३५१ (१६.६०%) मतदारांनी सकाळच्या सत्रात मतदान केले. यामध्ये ७८ हजार ४०० पुरुषांनी तर ६७ हजार ९४१ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. चार तासाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक मतदान यावल येथे 25.45 टक्के झाले. तर सर्वात कमी टक्के मतदान भडगाव येथे 8.98 इतके झाले.

चार तासात जिल्ह्यात नगरनिहाय मतदानाचा टक्का टक्के मतदान?

जामनेर 15.58 टक्के, भुसावळ 16.57 टक्के, यावल 25.45 टक्के, फैजपूर 24.20 टक्के, पाचोरा 11.68 टक्के, वरणगाव 19.47 टक्के, अमळनेर 15.79टक्के, चाळीसगाव 17.03 टक्के, सावदा 13.01 टक्के, चोपडा 14.09 टक्के, रावेर 20.02 टक्के, भडगाव 8.98 टक्के, धरणगाव 18.77 टक्के, एरंडोल 21.82 टक्के, पारोळा 16.76 टक्के, नशिराबाद 15.05 टक्के, मुक्ताईनगर 14.97 टक्के, शेंदुर्णी 18.91 टक्के.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now