नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक : जळगाव जिल्ह्यात दुपारपर्यंत ‘इतके’ टक्के मतदान

डिसेंबर 2, 2025 2:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी आज दि २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेपासून मतदानास सुरुवात झाली असून दुपारी १.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण २९.४९ टक्के मतदान झाले आहे. दुपारपर्यंत मतदानाच्या टक्केवारीने निम्माही टप्पा गाठला नाहीय.

loksabha election jpg webp

सुरुवातीच्या दोन तासात जिल्ह्यात ६.१ टक्के मतदान झाले होते. यांनतर सकाळच्या ११.३० वाजेपर्यंत १६.६०% टक्के मतदान झाले होते. यानंतर मतदारांनी उत्साहाने मतदानाला प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसले. दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात २९.४९ टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यात यावल नगरपालिका सर्वाधिक मतदानासह अग्रेसर ठरली. येथे दुपारच्या १.३० वाजेपर्यंत ४०.७९% मतदान झाले. तर भडगावात सर्वाधिक कमी १७.८५ टक्के मतदान झाले.

दुपारी १.३० वाजेपर्यंत जिल्हयात एकूण ८ लाख ८९ हजार ९१४ मतदारांपैकी २ लाख ५९ हजार ९७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये १ लाख ३३ हजार ०५३ पुरुषांनी तर १ लाख २६ हजार ९२४ महिलांनी मतदान केलं. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक मतदार केंद्रांवर सुरुवातीला मंद गती असलेले मतदान हळूहळू ओढ घेत असल्याचे दिसत असून दुपारनंतर मतदानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

नगरनिहाय मतदानाचा टक्का (दुपारी 1.30 पर्यंत)

जामनेर 27.97 टक्के, भुसावळ 27.99 टक्के, यावल 40.79 टक्के, फैजपूर 38.96 टक्के, पाचोरा 24.13 टक्के, वरणगाव 33.33 टक्के, अमळनेर 28.76 टक्के, चाळीसगाव 29.55 टक्के, सावदा 25.22 टक्के, चोपडा 26.24 टक्के, भडगाव 17.85 टक्के, रावेर 34.55 टक्के, धरणगाव 34.72 टक्के, एरंडोल 38.78 टक्के, पारोळा 31.10 टक्के, नशिराबाद 29.05 टक्के, मुक्ताईनगर 27.15 टक्के, शेंदुर्णी 34.02 टक्के.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now