एरंडोलजळगाव जिल्हा

एरंडोलात नपा प्रशासक व महिला कोरोना योध्दांचा सत्कार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । एरंडोल येथे जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम श्रीराम चौक बुधवार दरवाजा परिसर येथे २६ रोजी घेण्यात आला. त्यात नपा प्रशासक व महिला कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला. तर मेडिकल असोसिएशनतर्फे मास्क वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी आपल्या मनोगतात, मनाला महिलांनी व मुलींनी स्वावलंबी बनावे व कर्तुत्ववान बनावे ‌तर उपनगराध्यक्ष छायाताई दाभाडे, डॉ. स्नेहल पाटील, प्रा.डॉ. स्वाती पाटील, सुरेखा पाटील डॉ. आसावरी पाटील, यांनी आपल्या मार्गदर्शनात महिला आरोग्य, मानसिकता बदलण्याची गरज विषयी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात एरंडोल ग्रामीण रुग्णालयातील महिला परिचारिका, नर्स यांनी कोरोना काळात अहोरात्र उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महिला कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

दरम्यान, नगरपालिकेचे प्रशासन विकास नावळे यांचा स्वच्छ शहर, सुंदर शहर व स्वच्छता, वृक्षारोपण व वैज्ञानिक दृष्टिकोन या बाबत उल्लेखनीय कामगिरी याबद्दल प्रतिष्ठानतर्फे त्यांचा नागरिक जाहीर सत्कार करण्यात आला. नपा प्रशासक यांनी हा सत्कार माझा नसून संपूर्ण नगरपालिकेचा व सर्व सफाई कामगारांचा आहे व शहरातील नागरिकांचा सकारात्मक सात असल्यामुळे कामे होत आहेत असे मत व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांचे स्वागत प्राचीता पाटील, सूत्रसंचालन चानाक्षी जाधव, आभार मेघा पाटील यांनी केले. या प्रसंगी माजी नगरसेविका हर्षाली महाजन, कल्पना महाजन जयश्री पाटील, शोभा पाटील यांच्यासह महिलावर्ग तर गोपाल शामू पाटील, गोरख महाजन, मधुकर महाजन, बाबूलाल महाजन, सदानंद पाटील, जंगलु पाटील, गोकुळ शंकर महाजन, नथू लोहार, शशिकांत पाटील, जितेंद्र पाटील, सुनील चौधरी व सुनील पाटील उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठान अध्यक्ष प्रा.नितीन पाटील, उपाध्यक्ष अमर महाजन, सचिव प्रदीप फराटे, खजिनदार डॉ.सुमेघ महाजन, ऋषिकेश महाजन, अमित पाटील, आबा महाजन, कृष्णा पाटील, दिनेश पाटील, ओम पाटील, प्रशांत लोहार, पुष्पक पाटील, संजय महाजन, महेश पाटील, गणेश पाटील, देव जाधव, सागर शिंपी , टोनी शिरवाणी, बंटी शिरवाणी व जय श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button