⁠ 
शनिवार, जुलै 20, 2024

अंतरंग क्रिडा उत्सवाचे शानदार उदघाटन ; २९ ला समारोप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या अंतरंग क्रिडा उत्सवाचा शानदार प्रारंभ झाला. यावेळी संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते अंतरंग २ के २४ लोगो अनावरण, मशालीव्दारे ज्योतप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकिय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, गोदावरी नर्सिंगच्या प्राचार्य विशाखा गणविर, डॉ. केतकी पाटील स्कुल ऑफ नर्सिंगचे प्राचार्य प्रा. शिवा बिरादर, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे यांचेसह प्राध्यापक, कर्मचारी वर्ग उपस्थीत होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला खेळाडूंकडून मार्च पास्ट करण्यात आला. संप्तरंगी फुगे अवकाशात सोडण्यात आले. सर्व खेळाडूंचा परिचय मान्यवरांशी करून देण्यात आला. यानंतर क्रिकेट स्पर्धाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले व क्रिडा उत्सवाचा प्रारंभ झाला. या सप्ताहात दि२४ व दि २५ रोजी क्रिडा स्पर्धा होणार आहे. २८ रोजी फ्रेशर्स पार्टी व २९ रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा अंतरंग २४ स्नेहसंमेलनाने समारोप करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी प्रा पियुष वाघ, प्रा. रेबेका लोंढे, प्रा. अस्मीता जूमडे, प्रा सुमैया, प्रा साक्षी, प्रा. अभिजीत राठोर, प्रा. अक्षय आदि सर्व विदयार्थी समीतीच्या सदस्यांनी सहकार्य केले