Muktainagar : गुटख्याचे वाहन परस्पररीत्या सोडल्याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षकासह चार कर्मचारी निलंबित

ऑगस्ट 9, 2024 2:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२४ । ताब्यात घेण्यात आलेले गुटख्याचे वाहन परस्पररीत्या सोडून दिल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरिक्षकासह ४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली असून या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

Maharashtra Police Bharati 2022

खरंतर महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी आहेत. मात्र महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात गुटख्याची सर्रासपणे विक्री होत असल्यामुळे महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या बॉर्डवरील मुक्ताईनगर या भागातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी किंवा वाहतूक होत असल्याचे निर्दशनास आले आहे.

गेल्या काही दिवसात महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांच्या पथकाने गुटख्याचे मोठे कंटेनर पकडले होते. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी सुद्धा कारवाई करून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाला ताब्यात घेतले होते. त्यानंतर खुद्द मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून पोलीस स्टेशनला आणले होते. यामुळे हा प्रकार अजून चर्चेत आला होता.

मात्र पुढील कोणतीही कारवाई न करता ते वाहन परस्पर सोडून देण्यात आले. पोलीस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या संदर्भात सखोल चौकशी करून सदर प्रकरणात संशयास्पद भूमिका घेणारे मुक्ताईनगर पोलीस स्थानकात कार्यरत उपनिरिक्षक राहूल बोरकर यांच्यासह हवालदार गजानन महाजन, कॉन्स्टेबल डिगंबर कोळी व निखील नारखेडे तसेच नाईक सुरेश पाटील यांना निलंबीत केले आहे. त्यानुसार मुक्ताईनगर पोलीस स्थानकाचे पाच कर्मचारी निलंबीत झाले आहेत. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now