MPSC मार्फत सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी; लिपिकसह विविध पदांच्या 938 जागांसाठी भरती

ऑक्टोबर 7, 2025 2:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही MPSC परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळविण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) ने ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५’ ची घोषणा केली आहे. या परीक्षेद्वारे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये ही भरती होणार आहे.

Maharashtra Group C Services 1

विशेष या भरतीसाठी पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी असणार आहे. या भरतीद्वारे एकूण ९३८ रिक्त पदे भरली जातील. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. आणि अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी सुरु होत आहे. तर २७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. MPSC च्या अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in ला भेट देऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात.

कोणती पदे भरली जाणार?

१) उद्योग निरीक्षक – 9 जागा
२) तांत्रिक सहायक – 4 जागा
३) कर सहायक – 73 जागा
४) लिपिक टंकलेखक – 852 जागा

पात्रता काय?

उद्योग निरीक्षक व गट-क संवर्ग वगळता, इतर पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्य अर्हता असणे आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क –
संयुक्त पूर्व परीक्षेसाठी परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. ३९४ आणि आरक्षित प्रवर्गांसाठी (SC, ST, OBC, EWS, अनाथ, माजी सैनिक) रु. २९४ आहे.

इतका पगार मिळेल?
उद्योग निरीक्षक – Rs. 35,400-1,12,400/-
तांत्रिक सहाय्यक – Rs. 29,200 – 92,300/-
कर सहाय्यक – Rs. 25,500 – 81,100/-
लिपिक-टंकलेखक– Rs. 19,900 – 62,200/-
अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक पदांसाठी विशिष्ट टंकलेखन गती आवश्यक आहे. कर सहाय्यकासाठी, उमेदवारांकडे मराठीत किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये ४० शब्द प्रति मिनिट गतीचे शासकीय प्रमाणित टंकलेखन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लिपिक-टंकलेखकासाठी, मराठीत ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजीमध्ये ४० शब्द प्रति मिनिट गती आवश्यक आहे. शासकीय निर्देशांनुसार, दिव्यांग व्यक्ती (PwD), माजी सैनिक आणि अनाथ यांसारख्या काही आरक्षित श्रेणींना टंकलेखन चाचणीतून सूट दिली जाते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now