पदवीधरांना अधिकारी बनण्याची उत्तम संधी ! MPSC मार्फत 552 जागांसाठी पदभरती

एप्रिल 10, 2026 6:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी सदंर्भ । महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या माध्यमातून एकूण ५५२ रिक्त पदांची भरती केली जाणार असून, यामध्ये सर्वाधिक पदे पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि राज्य कर निरीक्षक (STI) या संवर्गातील आहेत.

MPSC

पदवीधर उमेदवारांना अधिकारी बनण्याची ही उत्तम संधी आहे. याभरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार MPSC च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2026 आहे. त्यापूर्वी पात्र उमेदवारांनी अर्ज करावा.

आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या पदांमध्ये प्रशासनातील महत्त्वाच्या तीन पदांचा समावेश आहे:
पोलीस उप निरीक्षक (PSI): ३१० पदे
राज्य कर निरीक्षक (STI): २३६ पदे
सहायक कक्ष अधिकारी (ASO): ०६ पदे

पात्रता आणि अटी:

या परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे अनिवार्य आहे. विशेषतः पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी शारीरिक पात्रता देखील महत्त्वाची आहे:
पुरुष: उंची १६५ सेमी आणि छाती ७९ सेमी (न फुगवता).
महिला: उंची १५७ सेमी असणे आवश्यक आहे.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2026 रोजी [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 38 वर्षे
पद क्र.2: 18 ते 38 वर्षे
पद क्र.3: 19 ते 31 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now