MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर भरती जाहीर, जाणून घ्या पात्रता??

सप्टेंबर 6, 2023 3:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भरती संदर्भ । स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी झाली आहे. अधिसूचनेनुसार पात्र उमेदवारांना MPSC च्या संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे. MPSC Bharti 2023

mpsc jpg webp

या भरतीद्वारे एकूण 266 जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ 149
शैक्षणिक पात्रता :
प्रथम श्रेणी B.E./B.Tech./B.S. and M.E./M.Tech./M.S.

2) सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ 108
शैक्षणिक पात्रता :
(i) Ph.D. (ii) प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य. (ii) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 6 संशोधन प्रकाशने. (iii) 08 वर्षे अनुभव

3) सहाय्यक प्राध्यापक, शासकीय फार्मसी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ 06
शैक्षणिक पात्रता :
प्रथम श्रेणी B.Pharm & M.Pharm.

4) वैद्यकीय अधीक्षक, MCGM, गट अ 03
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) रुग्णालय प्रशासनातील PG डिप्लोमा/पदवी

वयाची अट : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी,19 ते 50 वर्षे असावे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट] तसेच
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2023

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now