⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

जळगावात जिल्ह्यात पुन्हा कुख्यात गुन्हेगारावर ‘एमपीडीए’

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२३ । जळगाव जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारांवर एमपीडीए कारवाया करण्याचा विडा उचलला असून एलसीबीची टीम जोमाने कामाला लागली आहे. स्थानिक पोलिसांकडून होत असलेल्या झटपट कामामुळे दर आठवड्याला एक कारवाई सुरू आहे. सोमवारी अट्टल गुन्हेगार मुकेश प्रकाश भालेराव (वय-२८, रा. टेक्निकल हायस्कुल मागे, ह मु. भिलवाडी यावल नाका जवळ भुसावळ) याला एमपीडीएनुसार स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढले.

जळगाव पोलिसांनी गेल्याच आठवड्यात अमळनेर येथील शुभम उर्फ दाऊद याच्यावर एमपीडीएची कारवाई केली होती. तत्पूर्वी जिल्ह्यातील आणखी दोघांवर एमपीडीए करण्यात आला. भुसावळ शहर व तालुका पोलीस ठाण्यात मुकेश भालेराव याच्यावर सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी भालेराव याला अटक केल्यानंतर तो जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा गुन्हे करीत होता. त्यामुळे समाजातील नागरिकांमध्ये भिती व दहशत निर्माण होवून त्याला कायद्याचा अजिबात धाक राहिलेला नसल्याने समाजात असुरक्षतेची भावना निर्माण झाली होती.

पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या सुचनेनुसार भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांनी एमपीडीए प्रस्तावाची चौकशी करुन दि.११ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांच्याकडे तो पाठविण्यात आला होता.

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी भालेराव याच्या आदेशावर सोमवारी स्वाक्षरी करीत एमपीडीएचे आदेश काढले. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन, पोलीस उपनिरीक्षक आसिफ खान यूसूफ खान, स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ युनूस शेख, सुनिल दामोदरे, जयवंत चौधरी, मोहंम्मद अली, अनिल चौधरी, संजय पाटील, सुपडू पाटील, विकास बाविस्कर, भूषण चौधरी यांच्या पथकाने सोमवारी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी केली आहे.