⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | ‘महिला क्रिकेट कप – २०२२’ स्पर्धेस खासदार रक्षा खडसेंची उपस्थिती

‘महिला क्रिकेट कप – २०२२’ स्पर्धेस खासदार रक्षा खडसेंची उपस्थिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२२ । भुसावळ शहर येथे महिला क्रिडा मंडळ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला क्रिकेट कप – २०२२’ स्पर्धेस आज खासदार रक्षाताई खडसे यांना उपस्थित राहून महिलांच्या क्रिकेट सामन्यांचा आनंद घेतला, तसेच विजेत्या संघाला व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बक्षिस वितरण केले.

‘महिला क्रिकेट कप – २०२२’ स्पर्धेस उपस्थित खेळाडू, प्रेक्षक यांना संबोधित करतांना खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सांगितले की महिला सक्षमिकरणासाथी अशा वेगवेगळ्या स्पर्धांचे महिलांसाठी आयोजन करण्यात आले पाहिजे, जेणे करून आपल्या सारख्या ग्रामीण भागातील महिलांना आपल्या कलागुणांना सदर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल व ते भविष्यात देशातील उच्च पातळीवर प्रतिनिधित्व करण्यास सज्ज होतील.

यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्ष सौ.रजनीताई सावकारे, भुसावळ नगरपालिका मुख्याधिकारी श्री.संदीप चिद्रवार, श्री.अनिकेत पाटील, डॉ.मधू मानवतकर, डॉ.विकास कोळंबे, डॉ.वर्षा कोळंबे, महिला क्रीडा मंडळ अध्यक्ष सौ.आरती चौधरी, प्राची राणे, प्रभा पाटील, चारू महाजन, वैशाली भगत, राजश्री कल्याणकर चौधरी, रोटरी रोटरीयन जी.आर.ठाकूर, रोटरी प्रेसिडेंट राजेंद्र फेगडे , रनर्स ग्रुपचे प्रवीण फालक, डॉ.नीलिमा नेहते, एपीआय रूपाली चव्हाण आदी उपस्थित होते उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह