⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

MP Bus Accident : बस अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी माहिती, म्हणाले..

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ । मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस.टी.महामंडळाला दिले आहेत. दरम्यान, समोरुन येत असलेल्या दुचाकीला वाचवत असताना बस नदीत कोसळली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

अमळनेर डेपोची बस अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा आहे. अमळनेर डेपोची बस क्रमांक एमएच.४०.एन.९८४८ बस ही इंदूर येथे गेली होती. तेथून परतीच्या प्रवासासाठी बस अमळनेरच्या दिशेने सकाळी ७.३० वाजता निघाली होती. खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्‍या कलघाट गावाजवळ संजय पुलावरून सकाळी १० वाजेच्या सुमारास नर्मदा नदीच्या पात्रात ही बस कोसळली. यात सुमारे ४० प्रवासी असून यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बसमधील १३ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून १५ जणांना वाचविण्यात यश आल्याची माहिती आहे.

पुलावरील मोठा खड्डा चुकविताना हा अपघात झाला असावा किंवा एखाद्या वाहनाला ओव्हरटेक करताना पुलाचे रेलिंग तुटून बस नर्मदा पात्रात कोसळली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तांत्रिक बिघाडामुळे ब्रेक फेल होऊन बस कोसळल्याची माहिती देखील समोर आली होती. दरम्यान, समोरुन येत असलेल्या दुचाकीला वाचवत असताना बस नदीत कोसळली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना राज्यशासनाकडून १० लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. मी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी बोललो आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
हे देखील वाचा : MP Bus Accident : १३ मृतदेह नदीतून बाहेर काढले, १० मृतदेहांची पटली ओळख, जळगावच्या चौघांचा समावेश

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेश मधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या दुर्घटनसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना दिल्या. बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची, माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७-२२२३१८० आणि ०२५७-२२१७१९३ असा आहे.