⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | पोलिसांनी पकडलेले मोटार सायकल चोर : मोटार सायकलचा देखील लागला शोध

पोलिसांनी पकडलेले मोटार सायकल चोर : मोटार सायकलचा देखील लागला शोध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२३ ।  चोरीच्या पाच मोटार सायकलसह तिघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. मोटार सायकल चोरीच्या एका गुन्ह्याच्या तपासात तिघांना चौकशी कामी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकुण पाच मोटार सायकल चोरीची कबुली मिळाली. त्या पाचही मोटार सायकल तिघा चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. तिघे चोरटे हे गॅरेजवर काम करणारे तरुण आहेत.

रायसोनी नगर, अयोध्या नगर परिसरात राहणारे अनिकेत पवार यांची अ‍ॅक्टीव्हा मोटार सायकल एप्रिल महिन्यात चोरीला गेली होती. त्याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार मोटार सायकल चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्या चोरीच्या तपासादरम्यान एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पारोळा तालुक्यातील रहिवासी व गॅरेजवर काम करणा-या तिघांना ताब्यात घेण्यात आले. नंदकिशोर उर्फ बाळा सुभाष पाटील, हर्षल उर्फ दादू सुभाष देवरे (दोघे रा. सावरखेडे ता.पारोळा) आणि संदीप राजेंद्र पाटील (रा. करमळा ता. पारोळा) अशी या तिघांची नावे आहेत.

मुळ गुन्ह्याच्या तपासाव्यतिरिक्त इतर चार मोटार सायकलींपैकी दोन मोटार सायकल चोरीचे गुन्हे इंदीरानगर नाशिक आणि पारोळा पोलिस स्टेशनला दाखल आहेत. इतर दोन मोटार सायकली चोरट्यांनी भडगाव आणि भडगाव – पाचोरा रस्त्यावरुन चोरी केल्या आहेत. पो.नि. जयपाल हिरे यांच्या तपास पथकातील पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. गणेश शिरसाळे, जितेंद्र राजपूत, पो.ना. विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, पो.कॉ. छगन तायडे, इश्वर भालेराव, हे.कॉ. चालक इम्तीयाज खान आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. पुढील तपास हे.कॉ. गणेश शिरसाळे करत आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह