⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

माता सुरक्षित, घर सुरक्षित.. पाचोऱ्याला महिलांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोम्बर २०२२ । पाचोरा येथील शिवाजीनगर येथे दि. 3 ऑक्टोंबर रोजी माता सुरक्षित तर घर सुरक्षित या कार्यक्रमांतर्गत शिबीर घेण्यात आले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान वाघ यांच्या मार्गदर्शनांनी अठरा वर्षावरील सर्व महिला व किशोरवयीन मुलींची रक्ताची तपासणी करून त्यांना औषधी वाटप करण्यात आले तसेच महिलांची उंची वजन व बीएमआय काढण्यात आला.

विशेष म्हणजे, शासनाच्या या अभियानामुळे ज्या महिला दवाखान्यात जाऊ शकत नाही, अशा महिलांसाठी या अभियानाचा सर्वात मोठा फायदा झाला आहे. या अभियानाला माता सुरक्षित तर सुरक्षित असे नाव देण्यात आले. डॉ. पटवारी मॅडम शेख सलमान, आरोग्य सेविका भारती पाटील, लॅब टेक्निशियन शेख साहील, आशा वर्कर प्रतिभा पाटील, राजश्री पाटील, लीना पाटील, वैशाली पाटील यांनी परिश्रम घेतले.