जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । यावल तालुक्यातील साकळी येथील रेशन दुकानदार अशोक पद्माकर नेवे (54) यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही घटना घडली.
अशोक पद्माकर नेवे हे यावल येथे स्वस्त धान्य दुकानदारांचे आंदोलन पार पडल्यानंतर दिवसभरात नेवे यांनी आपली खासगी कामे आटोपली व सायंकाळी दुचाकीने अंकलेश्वर-बर्हाणपूर मार्गावरून साकळीकडे निघाले असता यावल शहराबाहेर वढोदा गावाजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.
अपघातात नेवे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्यासह चेहर्याला गंभीर दुखापत झाली. वढोदा ग्रामस्थांनी त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी.बारेला व सहकार्यांनी प्रथमोपचार केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगावला नेण्याचा सल्ला दिला मात्र उपचारार्थ हलवत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मयत अशोक नेवे हे पत्रकार चंद्रकांत नेवे यांचे बंधू आहेत.