रेल्वे प्रवाशांसाठी सुखद वार्ता ! या गाड्यांना जोडले जाणार अधिक जनरल डब्बे

ऑगस्ट 11, 2025 5:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे रेल्वेनं आठ गाड्यांना प्रत्येकी तीन अतिरिक्त जनरल डब्यांची कायमस्वरूपी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दैनंदिन प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

train 3 jpg webp

नुकताच रक्षाबंधन सण झाला आहे. येत्या काळात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, गणेशोत्सव, पोळा, ईद-ए-मिलाद सण-उत्सवांची रेलचेल आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच गाड्यांना प्रवाशांची गर्दी होत आहे. याचदरम्यान दक्षिण मध्य रेल्वेने आठ गाड्यांना प्रत्येकी तीन अतिरिक्त जनरल डब्बे वाढविण्याचा निर्णय घेतला. याची अंमलबजावणी येत्या 17 ऑगस्टपासून होणार आहे. मराठवाड्यातील प्रवाशांना यामुळे दिलासा मिळाला आहे. प्रत्येक डब्यात 100 याप्रमाणे गाडीनिहाय 300 प्रवाशांना आसन मिळणार आहे.

जनरल डबे वाढवलेल्या गाड्या आणि क्रमांक
हुजूरसाहेब नांदेड ते मनमाड (57651), मनमाड ते हुजूरसाहेब नांदेड (57652), पूर्णा -आदिलाबाद (57653), आदिलाबाद – परळी वैजनाथ (57654), परळी वैजनाथ ते अकोला, अकोला ते पूर्णा, पूर्णाते परळी वैजनाथ (57657) आणि परळी वैजनाथ ते पूर्णा (57658) अशा गाड्या आहेत. वर नमूद अनुक्रमे पहिल्यागाडीला 17 ऑगस्ट, दुसऱ्या आणि तिसऱ्या गाडीला तीन जनरल डबे जोडले जाणार आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now