दिवाळी निमित्त महामंडळाच्या ज्यादा बसेस धावणार, मात्र
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळातर्फे अधिकच्या बसेस सोडण्यात येणार आहेत. मात्र महामंडळाने दहा टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक कळ सोसावी लागणार आहे.
जळगाव हून पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांना 605 रुपये ऐवजी 665 रुपये मोजावे लागणार आहेत तर मुंबईचे भाडे हे 635 रुपयांवरून थेट 700 रुपये इतके झाले आहे. एकंदरीत महामंडळाने ५ ते ६५ रुपयांपर्यंत भाव वाढ केली आहे
सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे येथून मोठ्या प्रमाणावर नागरिक जळगावला येत असतात. यामुळे आतापासूनच कित्येक गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. यामुळे खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीकडून जादा भाडे आकारण्यात येत आहे. पर्यायी नागरिकांनी महामंडळाच्या बसेसला पसती दिली होती. मात्र आता महामंडळाच्या बसेसचे देखील दर वाढल्याने नागरिक चिंतीत झाले आहेत. 20 ऑक्टोबर पासून ते 30 ऑक्टोबर पर्यंत ही दरवाढ असणार आहे.