⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Monsoon News : प्रतीक्षा संपणार? उद्यापासून जळगाव जिल्ह्यात सलग पाच दिवस पावसाचा जाेर!

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात दाखल झालेल्या मान्सूनने अनेक ठिकाणी पाठ फिरवली. १३ जून रोजी जळगावात मान्सून दाखल झाला होता. जिल्ह्यात पूर्वमाेसमी पावसाने हजेरी लावली हाेती. त्यानंतर मान्सून दाखल हाेऊन देखील पावसाने दडी मारली. पहिल्याच मान्सूनने जळगावकडे पाठ फिरवली असून जळगावकर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, अशातच हवामान विभागाने उद्या रविवारी १९ जूनपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जाेर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

राज्यात मोसमी पावसासाठी सध्या पाऊस पोषक वातावरण असून यामुळे चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी मान्सून राज्यात दाखल झाला होता.त्यानंतर दोन ते तीन दिवसात गुजरातमार्गे मान्सून खान्देशात दाखल झाला होता. त्यामुळे चांगल्या पावसाची अपेक्षा होती. परंतु पहिल्याच पावसाने जळगाव जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे.

जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मान्सून दाखल हाेऊन देखील पावसाने दडी मारली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. मात्र जिल्ह्यात म्हणावं तसा पाऊस झालेला नाहीय. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी वर्ग देखील चिंतेत आला आहे. निम्मा जून उलटला तरी देखील जिल्ह्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली नाहीय. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

दरम्यान, हवामान विभागाने येत्या रविवारी १९ जूनपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जाेर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून काेकण आणि मुंबईत सक्रिय झाला असून लवकरच राज्यातील अन्य भागात देखील पाऊस हाेणार असल्याचा अंदाज आहे.