---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर महाराष्ट्र राजकारण

माकडाचा गंध मुक्तीचा कार्यक्रम, गावकऱ्यांनी सुतकही पाळले ; जळगाव जिल्ह्यातील प्रकार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२३ । उन्हाळा ! हा इतका शब्दच ऐकला की संपूर्ण जळगावकरांच मन थक्क होऊन जात. कारण आपल्या जळगावत जितक ऊन पडतं तितक ऊन अख्ख्या महाराष्ट्रात पडत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात जळगावची ओळख ही जळगावात पडणाऱ्या उन्हामुळेच आहे. पर्यायी उन्हाळा आला की जळगावकर थोडा घाबरतोच. मात्र स्वतःच्या जिद्दी स्वभावामुळे असे कित्येक उन्हाळे जळगावकरांनी लिलया पेलले आहेत. जळगावात असलेल्या बंधाऱ्यामुळे जळगावात इतकं ऊन पडूनही पाण्याची समस्या कमीच येते. काही गाव वगळल्यास संपूर्ण जळगाव जिल्ह्याला उन्हाळ्यात देखील पाणी मिळतं. (water in jalgaon )

monkey dead in jalgoan jpg webp webp

माणसाला पाणी मिळतं. मात्र जनावरांचा काय? मुक्या प्राण्यांना उन्हाचे चटके लागतातच. अशावेळी कित्येकदा पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात जंगलातून मानवी वस्ती मध्ये प्राणी प्रवेश करतात. त्यात माकडांची संख्या ही जास्तच आहे. (death reatuals of monkey)

---Advertisement---

हिंदू धर्मानुसार माकड हे भगवान हनुमंताचे रूप आहे. यामुळे माकडाला हिंदू धर्मात पवित्र स्थान आहे. 2022 साली मे महिन्यामध्ये पाण्याच्या शोधात जळगाव जिल्ह्यातील पिलखेडा या गावात माकडांची एक टोळी आली होती. मात्र दुर्दैवाने विजेचा धक्का लागल्याने या टोळीतला एक माकड जखमी झाला. त्या माकडाला वाचवण्यासाठी गावातील काही नागरिकांनी त्वरित जळगाव पशु वैद्यकीय रुग्णालयात त्याला भरती केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.(pilkhed village jalgaon)

पुढे शोकाकुल अवस्थेत गावकऱ्यांनी त्या माकडाला गावात आणलं. एखाद्या माणसाप्रमाणे त्याचे अंत्यसंस्कार केले आणि गावभर त्याची अंत्ययात्रा काढली. हिंदू समाजात दहा दिवसांनी दशक्रियेचा विधी केला जातो आणि तोच विधी गावकऱ्यांनी या माकडाचा देखील केला. गावातील तरुणांनी मुंडन केले. अकराव्या दिवशी गंध मुक्तीचा कार्यक्रम देखील गावात करण्यात आला. संपूर्ण गावाने वर्गणी जमा करून जेवण देखील ठेवले होते.

दहा दिवस गावाने सुतक पाळले होते. दहाही दिवस हनुमान चालीसाचा जप गावकऱ्यांकडून करण्यात आला. एकीकडे संपूर्ण राज्यात तेव्हाही आणि आताही हनुमान चालीसावरून राजकीय वातावरण तापले असताना जळगाव जिल्ह्यातील पिलखेड गावाच्या नागरिकांनी हनुमानाची सेवा नक्की कशी करावी याचा प्रत्यय संपूर्ण जगाला घडवून दाखवला.(monkey dead due to electric shock)

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---