जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । शहरातील पिंप्राळा परिसरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांत एका विरुद्ध गुन्हा दाखल झाला.
शेख जलील शेख (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. पिंप्राळा परिसरात ही अल्पवयीन मुली वास्तव्यास आहे. दि. ४ रोजी मध्यरात्री ही घटना घडली. मुलीने आरडाआरेड केल्याने तीचे कुटूबीयांच्या लक्षात हा प्रकार आला. या प्रकरणी मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरुन शेख याच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाले तपास करीत आहेत.