⁠ 
रविवार, मे 5, 2024

मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, एकाच दिवसात १६ जणांना घेतला चावा

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । शहरात व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ पुन्हा दिवसेंन दिसव वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सोमवारी चक्क एकाच दिवसात १६ जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यात तीन बालकांचा समावेश असून शहरातील एकूण बारा व कुसुंबा येथील तीन तर भडगाव येथील येथील एका जणाला या मोकाट कुत्र्यांनी लक्ष केले.

शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून शहरातील चौकाचौकात तसेच विविध रस्त्यांवर या कुत्र्यांचे टोळके फिरत असतात. मध्यंतरी महापालिकेने कुत्र्यांचे निर्बीजीकरण प्रक्रिया सुरु केली. असे असले तरी मोकाट कुत्र्यांची समस्या मार्गी लागली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे शहरात मोठ्याप्रमात भिती निर्माण झाली आहे.

असा घेतला चावा

सोमवारी लहान मुले बाहेर खेळत असताना तर इतर व्यक्ती रस्त्याने जात अस ना अशा वेगवेगळ्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी सोळा जणांना चावा घेतला. यामध्ये जान्हवी सदाशिव सोनवणे या मेहरुण भागातील साडेतीन वर्षांच्या बालिकेचा तसेच इशू गणेश कुंभार (९. जळगाव) या दोन बालकांसह अमोल कुमावत (वय ११) दिव्या संतोष जाधव या कुसुंबा येथील १३ वर्षीय मुलीचा समावेश आहे.

यांचा घेतला चावा

संजू लालचंद बुन्हऱ्हाडे (वय ३२, रा. कुसुंबा), विजय सुरेश सोनार (२८, कांचन नगर), सुनील दगडू पवार (४५, खोटे नगर), रमेश सोनार (६५, जळगाव), कल्पेश निकम (२९, सुप्रीम कॉलनी), श्रीनाथ सुपडू निंबाळकर (२३, कुसुंबा), चैताली अर्जुन ठाकुर (३६, खोटे नगर) विनायक मधुकर गुरव (३२, जळगाव), अब्रार दगड पटेल (३२. जळगाव) गलाब खान मेहताब खान (५५, भडगाव) अफसाना शेख (३५, शाहूनगर) रुचिता धनंजय ठाकूर (२०, जळगाव) यांना कत्र्यांनी जखमी केले आहे.

हे देखील वाचा :