मोदींचा शेवटही हिटलरसखाच होईल : काँग्रेस नेत्याचं ‘सत्याग्रहा’ दरम्यान वादग्रस्त विधान

सहाय jpg webp

अग्निपथ योजनेविरोधात देशभरात तीव्र विरोध नोंदवला जात आहे. यामुळेच देशात ठीक – ठिकाणी हिंसक आंदोलने करण्यात येत आहेत. आणि हीच योजना मागे घेण्यात यावी यासाठी केंद्र सरकारवर विविध मार्गांनी दबाब टाण्यात येत आहे.मात्र काँग्रेसच्या एका नेत्याने पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वादग्रत वक्तव्य येत आहे. ते म्हणाले कि, केंद्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुबोध कांत सहाय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे ‘मोदी हिटलरच्या वाटेवर चालले तर हिटलरप्रमाणे त्यांचाही मृत्यू होईल’, असं वादग्रस्त विधान सहाय यांनी केलं आहे. अग्निपथ योजना आणि राहुल गांधींच्या ईडीच्या चौकशीवरून संतप्त झालेले काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी जंतर-मंतरवरील ‘सत्याग्रहा’च्या मंचावरून पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त टिप्पणी केली आहे.

काँग्रेस हा हुतात्म्यांचा पक्ष
झारखंडमध्ये आमचे युतीचे सरकार आहे, ते पाडण्यासाठी ईडीचे दीड महिन्यांपासून दररोज छापे पडत आहेत. भाजपाने आपली २-३ निवडून आलेली सरकारे कशी पाडली हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. मदारीच्या रूपाने या देशात आलेले मोदी पूर्णत: हुकूमशाही चालवत असल्याची टीका सहाय यांनी केली. तसेच काँग्रेस हा हुतात्म्यांचा पक्ष असून काँग्रेसने कधीच लक्ष्मणरेषा ओलांडली नसल्याचेही सहाय म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now