⁠ 
सोमवार, ऑक्टोबर 14, 2024
Home | वाणिज्य | दिवाळीपूर्वी मोदी सरकार देशवासियांना देणार गुडन्यूज! पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी करणार स्वस्त?

दिवाळीपूर्वी मोदी सरकार देशवासियांना देणार गुडन्यूज! पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी करणार स्वस्त?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२३ । मागील गेल्या काही महिन्यात देशातील वाढत्या महागाईने जनतेचं कंबरडे मोडून ठेवली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने जनता हैराण झाली असून याच पार्श्वभूमीवर जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारकडून विविध उपायोजना राबविल्या जात आहे. यातच गेल्या काही दिवसापूर्वी मोदी सरकारने घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये 200 रुपयांची कपात केली. यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला. त्यानंतर आता सरकार दिवाळीपूर्वी देशातील लोकांना आणखी एक मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत असल्याचं बोलंल जात आहे.

एलपीजीच्या किमतीत कपात केल्यानंतर जनता पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची वाट पाहत आहे. त्यामुळे लवकरच सरकार सर्वसामान्यांना गूड न्यूज देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकार दिवाळीच्या आसपास पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर 3 ते 5 रुपयांनी कमी करण्याची घोषणा करू शकतं

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलनं यासंदर्भात माहिती दिली आहे. आगामी काळात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार असून नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वसामान्यांना मोठ्या दिलासा दिला जाऊ शकतो, असा दावा देशांतर्गत ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलनं केला आहे.

उत्पादन शुल्कात कपात होणार
ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार, जनतेला दिलासा मिळाला तर, त्यामुळे उत्पादन शुल्क किंवा व्हॅटमध्ये कपात होणार आहे. मात्र, सरकारसाठी हा निर्णय तितकासा सोपा असणार नाही. रशिया आणि सौदी अरेबिया या वर्षाच्या शेवटपर्यंत तेल उत्पादनात कपात करतील. याच कारणामुळे कच्च्या तेलानं 10 महिन्यांतील उच्चांक गाठला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.