जळगावातील खड्ड्यासंदर्भात मनसेचे मनपा समोर ‘झोपा काढा’ आंदोलन
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२१ । जळगाव शहरामध्ये जवळपास दोन ते तीन वर्षापासून रस्त्यांचे तसेच भूमिगत गटारीचे काम सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची पूर्णत: वाताहात झालेली आहे. त्यातच ऐन पावसाच्या दिवसामध्ये तर जनतेला खराब रस्त्यांमुळे नरक यातना सहन कराव्या लागल्या व लागत आहेत. याबाबत आम्ही आपणांकडे निवेदने दिले असता तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वेळोवेळी आंदोलने करून सुध्दा हे प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. त्या प्रशासनाला उठविण्यासाठी आज सकाळी मनपा इमारतीत ‘झोपा काढू’ आंदोलन मनसे जिल्हा सचिव ॲड.जमिल देशपांडे, मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, जिल्हा संघटक राजेंद्र निकम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आपणांकडून आम्हांस सांगण्यात येते की, सद्यस्थितीत म.न.पा.जवळ पैसा नसल्यामुळे रस्त्यांची कामे पूर्ण होऊच शकत नाही, तसेच जी काही वसूलीची रक्कम येते ती रक्कम अमृत योजनेसाठी वापरली जाते, त्यामुळे आमचा नाईलाज झालेला आहे असे उत्तरे आयुक्त साहेबांकडून आम्हांस मिळत आहेत. महोदय, साहेब आपणांकडून अशा उत्तराची आम्हांस आता अपेक्षा नसून आपणाकडे जर रस्त्यांच्या कामासाठी पैसे नसतील तर आपण सुध्दा ऑफीसला का येत असतात ?
सदरील जळगांव शहरातील रस्त्यांची कामे ज्या संबंधित ठेकेदार/ इंजिनिअर्स यांना दिलेले असले त्यांचा आमच्याशी प्रत्यक्ष संपर्क करुन द्यावा अथवा त्यांचा मोबाईल नंबर आम्हांस द्यावा म्हणजे आम्हा आता त्यांनाच याबाबत जाब विचारणार आहोत. तरी महोदय साहेब आपणास आता आमची हात जोडून नम्र विनंती की, जळगांव शहरातील संपूर्ण रस्त्यांच्या कामांना 10 दिवसाचे आत सुरुवात करावी. या आशयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी जनहित शहर अध्यक्ष संदिप मांडोळे, मनविसे शहराध्यक्ष योगेश पाटील, संदीप महाले, जळगाव शहर संघटक निलेश अजमेरा, तालुका संघटक राजू बाविस्कर, महेश माळी, जळगाव तालुका संघटक गणेश नेरकर, कुणाल पाटील, कुणाल पवार, गोविंद जाधव,विशाल कुमावत, संतोष सुरवाडे, रमेश भोई, मनोज खुळे, निलेश खैरनार, अँड.दिनेश चव्हाण, मंगेश भावे, सिध्देस कवठाळकर, गोरख गायकवाड, संदिप पाटील आदी उपस्थित होते.