Thursday, July 7, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

MLC Election : अखेर खडसेंचा आवाज पुन्हा विधानमंडळात घुमणार !

khadse win
चिन्मय जगतापbyचिन्मय जगताप
June 20, 2022 | 9:12 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । Khadse Won MLC Election । विधान परिषद निवडणुकीसाठी १० जागांसाठी होणारी चुर्शीची निवडणूक असतानाच संपूर्ण जळगाव जिल्ह्याची ज्या निकालावर नज़र लागली होती. तो निकाल समोर आला आहे. तो म्हणजे एकनाथराव खडसे पुन्हा एकदा निडून आले आहेत. त्यांना २९ मते मिळाली. (Khadse Won MLC Election)

१० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात असल्यामुळे राज्य सभेप्रमाणे ही निवडणूक देखील चुरशीची ठरली होती. आमदार कोण होणार ? हे पाहणे उत्सुकतेचे असल्याने प्रत्येक मत महत्वाचे होते. त्यात महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार क्रमाक्रमाने मतदान केले. यातच एक मोठी बातमी समोर आली. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 28 मतांचा कोटा देण्यात आला होता. यामुळे आता खडसेंचा आमदार बनण्याचा मार्ग मोकळा झाल्यात जमा अशी चर्चा रंगू लागली होती.

विधान परिषद निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची करून ठेवली आहे. एकनाथराव खडसे यांच्या भोवती सर्व विधानपरिषदेचे राजकारण फिरत असून खडसे यांचा विजय होणार की नाही याकडे लक्ष लागून आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सकाळपासून सुरू झालेली मतमोजणी दुपारी चार वाजता संपुष्टात आली. निवडणुकीचा हक्क बजावलेल्या सर्व २८५ आमदारांची मते वैध ठरवण्यात आली आहेत. काही वेळापूर्वी भाजपच्या २ मतांवर काँग्रेसने आक्षेप नोंदवला होता. दरम्यान, निवडणूक आयोगाने आक्षेप फेटाळून लावल्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली होती.

मतमोजणीला सुरुवात झाली असून रात्री नऊ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता होती. विधान भवनाबाहेर सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली. जोरदार घोषणाबाजी केली. विधानभवनाबाहेर एकनाथराव खडसेंचे समर्थक मोठ्याप्रमाणात जमले असून जळगाव, खान्देश आणि पुण्याच्या समर्थकांचा समावेश आहे. नाथाभाऊंचा विजय असो अशी घोषणाबाजी सुरू असून विधानमंडळ बाहेर फलक देखील लागले आहेत.

कागदावरील आकडेमोडीत सोपी वाटणारी ही निवडणूक प्रत्यक्षात मात्र अवघड अशीच झाली. या निवडणुकीत राष्ट्रावादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे का काँग्रेसचे भाई जगताप असे चित्र रंगवले जात होते. कारण भाजपाकडून या दोन नेत्यांना लक्ष केले जाण्याची शक्यता होतीच व झालं हि तसच. खडसे हे फडणविसांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. यामुळे खडसेंना विधान परिषेत येण्यापासून कसे रोखता येईल? यासाठी भाजपाने ताकद लावली होती. मात्र एकनाथराव खडसे यांना भाजपकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस खडसे यांचा कोटा वाढवून देण्याची शक्यता वर्तवली जात असताना तसेच झाले आणि आता खडसे पुन्हा आमदार झाले आहेत.

गेल्या वर्षभरापासून किंबहुना जेव्हा पासून महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रावर आली तेव्हापासून भारतीय जनता पक्षाने विविध पद्धतीने विधिमंडळामध्ये महाविकासआघाडीला बदनाम करायचे किंवा काहीतरी घोटाळे बाहेर काढायचे अनेक प्रयत्न केले आहेत. भाजपवासी त्यात यशस्वी देखील झाले आहेत. मंत्री नवाब मलिक, मंत्री उदय सामंत, मंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ईडी आणि आरोपांचा ससेमिरा लागला. काहींना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे किंवा महाविकासाकडे भारतीय जनता पक्षाचे धिंडवडे काढू शकेल असा विधिमंडळामध्ये एकही नेता नाही. म्हणूनच आता एकनाथराव खडसे यांच्या रुपाने हा नेता राष्ट्रवादी काँग्रेसला किंबहूना महाविकासआघाडीला हवा आहे. महाविकास आघाडीची बाजू विधिमंडळामध्ये पूर्ण शक्तीने मांडू शकतील असे नेते नाथाभाऊ हे एकमेव असल्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने ही संधी दिली आहे.

 दुपारी४ वाजेपर्यंत सर्व आमदारांनी मतदान केल. विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा होता. गुप्त मतदानामुळे क्रॅास वोटिंग होण्याची दाट शक्यता होती मात्र तस काही झाल नाही. अर्थात भाजपा व महाविकास आघाडी दोघांनाही याचा सारखाच धोका होता. महाविकास आघाडी एकत्र दिसत असली तरी या तिन्ही पक्षात अंतर्गत मतभेद आहेत. राज्यसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसून आले. हेच गणित आता भाजपाला लागू होते. भाजपाची मोठी डोकंदूखी एकनाथराव खडसेंची आहेत. त्यांना क्रॉस वोटिंग झाल्यास ते सहज निवडून येतील, याची भीती भाजपाला सतावत आहे.मात्र अजून क्रॉस वोटिंग झाल्याचे निदर्शनास आले नाही.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in ब्रेकिंग, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र, राजकारण
SendShareTweet
चिन्मय जगताप

चिन्मय जगताप

पत्रकारिता क्षेत्रात गत ३ वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरात रिऍलिटी चेकचा विशेष अनुभव. मनपा, राजकारण क्षेत्रातील वृत्त संकलन. लाईव्ह, स्टुडिओत अँकरिंग. विशेष मुलाखतींची हाताळणी. विशेष वृत्त लेखन तसेच वृत्त संपादन.

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
khadse 3

Khadse Biodata : जाणून घ्या, एकनाथराव खडसेंचा संक्षिप्त जीवन परिचय

Eknath Khadse

भाजपमधील मित्रांची मला मते मिळाली : खडसेंचा गौप्यस्फोट

job 1

हा चान्स पुन्हा मिळणार नाही! 10वी उत्तीर्णांना अहमदनगर केंद्रीय नोकरीची संधी, 67 जागांसाठी भरती

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group