जळगाव शहराच्या विकासासंदर्भात आमदार राजुमामांची अशोक जैन यांच्यासोबत चर्चा

नोव्हेंबर 17, 2024 12:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ज्येष्ठ उद्योजक व जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे चेअरमन अशोक जैन व जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांची जळगावच्या विकासासंदर्भात व ‘व्हिजन डॉक्युमेंट 2024-2029’ यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

RB Ashok Jain

जळगाव शहराचा कायापालट करण्यासाठी राजूमामांनी येत्या पाच वर्षात करावयाची कामे यासंदर्भात अशोक जैन यांनी त्यांना मार्गदर्शन केले. जैन हिल्स येथे झालेल्या या भेटीत सामाजिक, औद्योगिक, व्यावसायिक, दळण-वळण, पर्यावरण, शैक्षणिक, क्रीडा, ऊर्जा आदि विषयांवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या दुग्धशर्करा भेटीमुळे जळगावला वैभवप्राप्त करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now