‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन ऑफ द खान्देश’ पुरस्काराने आमदार राजूमामा भोळे सन्मानित..

ऑक्टोबर 3, 2024 5:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२४ । जळगावचे आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांना लोकमत तर्फे ‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन ऑफ द खान्देश’ हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. आज दिनांक 3 ऑक्टोंबर 2024 गुरुवार रोजी कोल्हे हिल्स येथील एका दिमाखदार समारंभात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबभाऊ पाटील यांच्या हस्ते आमदार राजूमामा यांना हा पुरस्कार देण्यात आला.

awad rajumama bhole

याप्रसंगी व्यासपीठावर खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, धुळे येथील आमदार अमरीश भाई पटेल, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, लोकमतचे संपादक किरण अग्रवाल उपस्थित होते.

या निमित्ताने खानदेशातील निवडक पुरस्कारार्थी नेतृत्वाचा प्रोफाइल असलेले कॉफी टेबल बुक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. खानदेशातील राजकारण आणि समाजकारणात क्रियाशील असलेल्या गुणवंत नेतृत्वांचा सन्मान या सोहळ्याच्या निमित्ताने झाला. लोकमतचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती अपूर्वा वाणी यांनी सूत्रसंचालन केले. लोकमत चे महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी आभार मानले. हा पुरस्कार स्वीकारताना आमदार राजूमामा भोळे यांनी लोकमतचे आभार मानले.

rajumama award lokmat

तसेच जनतेच्या सेवेसाठी केलेल्या कार्याची घेतली जाणारी दखल, त्यासाठी होणारा सन्मान हा पुढील लोककार्याला बळ देणारा असल्याचं आ. भोळे म्हणाले. या पुरस्कार सोहळ्याला संकटमोचक नामदार गिरीषमहाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ, आ. अमरीशभाई पटेल, मा.अरुणभाई गुजराथी, डॉ. उल्हास पाटील आदी मान्यवरांची मोलाची उपस्थिती लाभली!

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now