⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

आ.मंगेश चव्हाणांनी आणला चाळीगावासाठी ५५ कोटींचा निधी; आता ‘ही’ कामे लागणार मार्गी

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२३ । चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती समोर येत आहे. या मंजूर निधीतून मतदारसंघात तालुक्यात मूलभूत सोयीसुविधांसह विविध विकासकामे होणार आहेत. पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी मांडण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी दिली.

ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी मोठा निधी आमदार चव्हाण यांनी आणला आहे. अधिवेशनात देखील मतदारसंघातील १२ रस्त्यांच्या कामांसाठी २६ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने दळणवळणाची साधने अधिक मजबूत होणार आहेत.

कोणते कामे होणार?

मंजूर झालेल्या रस्ते व पुलांची कामे, हातगाव व रोहिणी गावातील लांबीत सिमेंट कॉंक्रिटीकरण, श्‍यामवाडी ते निमखेडी रस्ता, दस्केबर्डी ते जामदा रस्ता, तरवाडे गावाजवळ सिमेंट काँक्रिट रस्ता, धामणगाव ते शिदवाडी रस्ता, पिंपरखेड ते राम-२११ हायवे, पिंप्री प्र. दे. चौफुली ते काकडणे फाटा रस्ता रुंदीकरणासह सुधारणा, देशमुखवाडी ते सायगाव रस्ता रुंदीकरणासह सुधारणा, सायगाव ते तळोदे फाटा रस्ता रुंदीकरणासह सुधारणा, माळशेवगे ते हिरापूर रस्ता रुंदीकरणासह सुधारणा, उंबरखेड येथे गटारीसह सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे बांधकाम इत्यादी कामे या निधीतून करण्यात येणार आहे.

त्याचसोबत नवीन प्रांत कार्यालय व प्रांताधिकारी, तहसीलदार निवासस्थाने, ग्रामीण रुग्णालयाजवळच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने बांधकाम, विश्रामगृह बांधकाम ही कामे देखील करण्यात येणार आहे.