⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

आमदार किशोर पाटीलांनी केला पुरस्कारार्थी डॉ.पाटीलांचा गौरव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बु. येथील डॉ. वायपी युवा फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. यशवंत पाटील यांना दिल्ली येथे नूकताच नॅशनल एक्सीलन्स पुरस्कार सन्मान करण्यात आला. या निमित्ताने आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते डॉ.पाटील यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.शवंत पाटील यांचे नॅशनल एक्सीलन्स पुरस्कार मिळाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी अभिनंद केले.

सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल यंदाचा नॅशनल एक्सीलन्स २०२२पुरस्कार केंद्रीय अवजड उद्योग व कौशल्य विकास मंत्री महेंद्रनाथ पांडेय, सामाजिक न्याय विकास व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवलें, मिझोरम चे माजी राज्यपाल अमोलक रतन कोहली, दिल्ली प्रशासनाचे पर्यावरण मंत्री जाकीर खान, राष्ट्रीय युवा पुरस्कार फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. जावीद जमादार, सेक्रेटरी डॉ. मनिष गवई, सुप्रसिद्ध कवि, लेखक, साहित्यकार, व्याख्याते, प्रकाशक, संपादक, राष्ट्रीय-अंतराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त क्रांति महाजन यांच्या उपस्थित हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यातून डॉ.यशवंत पाटील यांची सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल दिल्ली येथील निवड समितीने पत्र पाठवून त्यांची पुरस्कारासाठी निवड केली होती.

यावेळी फाउंडेशनचे विश्वास पाटील, संजयजी निकम, देवचंद गायकवाड, खडकदेवळा येथील सेक्रेटरी जगदिश पाटील, सारोळा येथील सरपंच विकास तात्या पाटील, आमदार पी.ए. सुधीर पाटील उपस्थित होते.