⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

धक्कादायक ! 100 कोटी द्या, मंत्रिपद मिळवा, राज्यातल्या दोन आमदारांकडे मागणी ; चौघे जेरबंद

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । राज्यात शिंदे- भाजपचे सरकार स्थापन होऊन तीन आठवडे उलटले. तरी देखील नवीन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही झालेला नाहीय. यात कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागून आहे. अशातच एक मोठी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे चक्क मंत्रीपद देण्यासाठी 100 कोटी रुपयांची मागणी देण्यात आल्याचं प्रकरण समोर आलंय. 100 कोटी द्या, मंत्रिपद मिळवा, अशी ऑफर चक्क एका आमदाराच देण्यात आली होती. याप्रकरणी अखेर क्राईम ब्रांचच्या (Mumbai Police Crime Branch) पथकाने कारवाई करत चौघा भामट्यांचा शोध घेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सध्याच्या वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

रियाज शेख, योगेश कुलकर्णी, सागर संगवई आणि जाफर उस्मानी अशी अटक करण्यात आलेल्लाय चौघांची नावं आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलंय. 2019 साली राहुल कुल यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. अखेर या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांची आता कसून चौकशी केली जातेय.

कशी दिली ऑफर?
12 तारखेला रियाज शेख यांने आमदारासोबत संपर्क साधला आणि त्यांना राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवून देतो, अशी ऑफर दिली. एक मोठी व्यक्ती आपलं काम करुन देईल, पण त्यासाठी 100 कोटी रुपये द्यावे लागतील, असं त्यानं आमदार साहेबांना सांगितलं. नंतर 100 ऐवजी 90 कोटी रुपयांत काम होईल, अशीही डील करण्याचा प्रयत्न झाला. पण आधी 20 टक्के रक्कम द्या, अशी मागणी रियाजने केली होती. आमदार साहेबांनीही 20 टक्के रक्कम देऊ, असं मान्य केलं. तोपर्यंत कुणाला कळणार नाही, अशाप्रकारे या सगळ्याबाबत पोलिसांनाही माहिती दिली.

रियाज हा पैसे घेण्यासाठी १८ जुलैला दुपारी दीडच्या सुमारास हॉटेल ओबेरॉय येथे पोहोचला. यावेळी कुल यांच्यासोबत स्वीय सहायक आणि आमदार जयकुमार गोरेदेखील होते. आमदारांनी इशारा करताच साध्या वेशात सापळा लावून बसलेल्या पोलिसांनी रियाजला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता ठाण्याच्या योगेश कुलकर्णी आणि सागर संगवई यांनी पैसे मिळाल्यास मंत्रिपद मिळवून देतो, असे सांगितल्याची माहिती त्याने दिली. त्यानुसार कुलकर्णी आणि संगवई यांना पकडण्यात आले. त्यांच्या चौकशीमध्ये नागपाडा येथील जाफर उस्मानी याचे नाव समोर आले. उस्मानीचा ओळखीचा व्यक्ती ५० ते ६० कोटी रुपये घेऊन मंत्रीपद मिळवून देत असल्याचे दोघांनी सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी जे. जे. मार्ग परिसरातून उस्मानीची धरपकड केली. या चौघांकडून सात मोबाइल हस्तगत करण्यात आले असून, यांचे दिल्लीपर्यंत जाळे आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत.