विधानसभेत कामकाज दरम्यान आमदार चंद्रकांत पाटलांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

मार्च 6, 2026 2:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून याच दरम्यान मुक्ताईनगर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची अचानक प्रकृती बिघडली. प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच तातडीने त्यांना मुंबईतील एच.एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

cp

सत्रादरम्यान अस्वस्थता जाणवल्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. त्यानंतर अधिक तपासणी आणि उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या सहायक प्रवीण चौधरी यांनी कळवले.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयात भेट देऊन आमदार पाटील यांच्या प्रकृती विचारपूस केली. डॉक्टरांशी चर्चा करून योग्य उपचार सुनिश्चित करण्याचे निर्देशही दिले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now